आंघोळ करताना चे व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २२ वर्षीय तरुणी आंघोळ करीत असताना तिच्या गुपचूप तिचे फोटो व व्हिडिओ तयार करून तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव मधील आयोध्यानगर येथे घडली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात आपल्या कुटुंबासह रहात असलेल्या परप्रांतीय २२ वर्षीय तरुणी १ जानेवारी २०२४ रोजी आंघोळ करत असताना राहुल योगराज पाटील वय २५ वर्ष, रा.आयोध्यानगर, जळगाव याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान, हा अत्याचार सहन न झाल्याने तिने अखेर एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार आरोपी राहूल योगराज पाटील वय २६ वर्ष, आयोध्यानागर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.