निंभोरा येथे युवक व महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
निंभोरा बु:ता: रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दि.१९ जानेवारी रोजी पहाटे सकाळी ५:०० वाजे दरम्यान रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरातील इंदिरा नगर भागात घरात युवक अजय अरुण तायडे वय २५ व महिला वय ३० या दोघांनी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली.या घटनेने परिसरात सर्वत्र खळखळून उडाली आहे.
याबाबत निंभोरा पोलिसात फिर्यादी वैभव राजू तायडे रा;रावेर यांनी खबर दिली. या संदर्भात निंभोरा पोलिसात १/ २०२५ अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. त्यासंदर्भात पुढील तपास स. पो.नि.हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.का अविनाश पाटील करत आहे. युवक हा घरातील एकुलता एक कमावता असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रावेर येथून शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले.