भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंड जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून १५,००० /जीरुपये किमतीचे गावठी पिस्तूल मॅगझिन सह व २०००/हा रुपये किमतीचे दोन जिवंत (राउण्ड)काडतूस जप्त केले आहे. याबाबत शनिवारी १ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील हनुमाननगर मधील टी.व्ही. ग्राउंडजवळ संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव (वय ३२, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हा तरुण बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी १ मार्च रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५,००० /जीरुपये किमतीचे गावठी पिस्तूल मॅगझिन सह व २०००/हा रुपये किमतीचे दोन जिवंत (राउण्ड)काडतूस जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पो उप निरीक्षक मंगेश बाधन, विजय नेकरक, भूषण चौधरी, सचिन चौधरी, अमर आढळे, योगेश माळी, राहुल वानखेडे,योगेश महाजन आदींनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!