भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अल्पवयीन मुली सह आईचाही विनयभंग, तरुणाला अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव तालुक्यातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भूषण सोपान पाटील. रा. शिरसोली तालुका जळगाव. या तरुणाने विनयभंग केला. इतकेच नव्हे तर त्याने मुलीच्या आईचाही विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.

दिनांक २७ जुलै रोजी जळगाव तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे वडील शाळेत सोडायला जात असताना भूषण पाटील याने मुलीकडे पाहून अश्लिल हावभाव केले. या विषयी मुलीच्या आई-वडिलांनी जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करीत मुलीच्या आईचाही विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आईने जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या वरून भूषण सोपान पाटील (रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!