भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

जमावाने बेदम मारहाण केल्याने तरुणाची हत्या, जामनेर मध्ये तणावपूर्ण शांतता

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील २१ वर्षीय तरुणाला अज्ञात कारणावरून बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रण असून अतिरिक्त कुमक जामनेर शहरात मागवण्यात आलेली आहे.

जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर येथे घडली. या घटनेमुळे जामनेर येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुलेमान रहीम खान पठाण असे जमावाच्या मारहाणीत मरण पावलेल्या बेटावद खुर्द येथील तरुणाचे नाव आहे. हा तरुण जामनेर येथे एका सायबर कॅफे मधे आला होता.

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे राहणाऱ्या सुलेमान रहीम खान पठाण (वय २१) याने सकाळी वडील व आजोबांसोबत शेतातील काम केले. यानंतर जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरून येतो असं सांगून तो घरातून निघाला. तिथून एका कॅफेवर असताना काही लोकांना त्याचा अज्ञात कारणावरून संशय आला आणि त्यांनी सुलेमानला बेदम मारहाण केली.जमावाने मारहाण करत त्याला बेटावद खुर्द या गावाच्या बाहेरील बस स्थानकाजवळ सोडून दिले.

गंभीर जखमी अवस्थेत सुलेमान घरी पोहोचला व कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच तो भोवळ येऊन कोसळला. घाबरलेल्या नातेवाईकांनी सुलेमानला तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याघटनेची माहिती मिळताच समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. या ठिकाणी पाच एसआरपीच्या तुकड्या पाठवण्यात आलेले आहेत व अतिरिक्त कुमकही त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!