भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

पिकप वाहनाचे टायर फुटल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, ६ जखमी

मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील घटना

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मलकापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर शनिवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने व चालकाकडून नियंत्रण सुटल्याने वाहन  पलटी झाले. या घटनेत बनिया सबला बारेला हा ठार झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणारे पिकअप वाहन (एमपी १० झेड डी ४४४७) तुरीचे पोते घेऊन येत असताना वाहनाचे टायर फुटले व चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. या अपघातामध्ये बनिया सबला बारेला (वय ४०, रा. अडनदी ता. सेंधवा जि. बडवानी, मध्य प्रदेश हल्ली मु. चिंचोली शिवार ता. जि. जळगाव) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर गुड्ड्या वरजू बारेला (रा. ढवळ्यागिर ता. सेंधवा जि. बडवाणी), प्रेमसिंग दिलदार बारेला,दाविद बनिया बारेला (दोन्ही रा. अडनदी ता. सेंधवा जि. बडवानी), विकास ठाकूर रावत (रा. पीपलझोपा ता. भगवापुरा जि. खरगोन), महेश रामलाल बारेला (रा. भागपुर नशिराबाद ता. जळगाव) हे जखमी झाले आहे.

चालक विनोद सहादरिया खरते (रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला मयत बनिया बारेला याचा भाऊ रामसिंग सुभाष उर्फ सबला बारेला (वय ४४ वर्ष, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) याने याबाबत फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महेश सुरवाडे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!