यावल तालुक्यात तरुणाची हत्या.. तीन जखमी..आरोपी ताब्यात..
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यात किरकोळ वादातून एका २९ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना तालुक्यातील हिंगोणा या गावात घडली. या घटनेने हिंगोणा परिसरासह यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील मूळ रहिवाशी हल्ली मुक्काम हिंगोणा येथील गौरव जाधव व प्रथमेश मुकेश महाले.वय १९ वर्ष. यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद इतका वाढत गेला की वादात चाकूचा वापर करण्यात आला. प्रथमेश महाले यांचेवर गौरव जाधव याने चाकू हल्ला केला.या हल्ल्यात प्रथमेश महाले गंभीर जखमीं होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला.
या चाकू हल्ल्यात रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी गौरव जाधव (रा. खर्डी, हल्ली मुक्काम हिंगोणा) हा पोलिसांच्या ताब्यात असून फैजपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

