भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावजामनेर

गावठी बंदुकी सह अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

जामनेर/जळगाव , मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l येथील शास्त्री नगर भागात गजानन महाराज मंदिराजवळ एक १७ वर्षीय अल्पवयीन तरुण रुमालाने तोंड बांधून संशयितरित्या फिरत असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या कडून गावठी बंदूक आणि चाकू जप्त केला.

३० डिसेंबर रोजी सुमारे नऊच्या सुमारास एक तरुण गजानन महाराज मंदिर परिसरात तोंड बांधून संशयास्पदरितीने फिरताना काही नागरिकांनी पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी त्याला रोखून चौकशी केली असता, त्याच्या कमरे जवळ नकली गावठी बनावटीची बंदूक व सुरा सापडला. यानंतर नागरिकांनी तातडीने जामनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी त्वरित पोलीस पथक घटनास्थळी पाठवून तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील शस्त्र सामग्री जप्त केली. सदर मुलास जामनेर पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू आहे. जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!