तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी महिला सरपंच अवघ्या पाच दिवसात अपात्र …….
- मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- शाळेतील जबाबदार कर्मचाऱ्यानेच केला तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग
तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील मंगेश निवृत्ती माळी ( वय-२२) या तरूणाने राहता घरी दुपारी एक वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी पाईपाला नायलॉनच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
आत्महत्येंचे नेमके कारण कळू शकते नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात त्याचे काका सुभाष महादू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.