जिल्हा परिषद अभियंता ठेकेदाराकडून दीड लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याला ठेकेदाराकडून दीड लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तुळप्रचंड खळबळ उडाली आहे.
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
- संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
- मुक्ताईनगर मध्ये लक्षवेधी लढतीत पुन्हा महायुतीचे चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसे पराभूत
तक्रारदार हे शासकीय स्थापत्य ठेकेदार आहेत. त्यांनी मौजे पाथरे (ता. सिन्नर) येथे नळ पाणी पुरवण्याचे काम नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचे ४८ लाखांचे देयक बिल तयार करुन त्यांनी ते मंजूर करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केले होते. संबधित शाखा अभियंता अमोल खंडेराव घुगे (४३) याने बिल मंजूर करण्यासाठी चार टक्के दराने एक लाख ९० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ५० हजार रुपये मागितले. त्यावर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचला. अभियंता घुगे यास दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. उपअधीक्षक अभिषेक पाटील, सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.