भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जि. प. अभियंता महिलेने पत्नीसमोरच अधिकार्‍ याशी वाद घालत कानशिलात लगावली : लव्ह स्टोरीची किनार असल्याची चर्चा

जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : जिल्हा परिषदेत एका अभियंता महिलेने जिल्ह्यातील तालुकास्तरावर कार्यरत अभियंत्यासोबत ऐन व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत विभागप्रमुखांच्या थेट दालनातच वाद घालत त्याच्या कानशिलात लगावली. हा सर्व झालेला दुर्दैवी प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. लव्ह स्टोरी बिनसल्याने सनकलेल्या अभियंता महिलेने सार्वजनिक केलेल्या या प्रकाराची दिवसभर चर्चा होती.

जिल्हा परिषदेच्या एका विभागात गेल्या काही दिवसानंतर आलेल्या अभियंत्याला थेट अधिकार्‍याच्या दालनातच एका दुसर्‍या विभागातील महिला अभियंत्याने प्रेयसी असतांना आपल्याला आता ओळखत नाही असे कारण देत  कानशिलात लगावल्या. विशेष म्हणजे संबधीत अभियंत्याच्या पत्नीे समोरच अचानक हा प्रकार मंगळवार, 3 रोजी दुपारी 12.30 वाजता घडल्याने काही वेळ जिल्हा परिषद मुख्य इमारतीत गोंधळ झाला व एकच गर्दी झाली होती. घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. प्रकरण वाढल्याने थेट महिला पोलिसांना जिल्हा परिषदेत पाचरण करण्यात आले.


विभाग प्रमुखांची मंत्रालय स्तरावरून व्हीसी सुरू असतांना एका तालुक्यातील अभियंता त्यांच्या दालनात बसलेला होता.तेव्हाच एक महिला कर्मचारी या दालनात आली आणि विवाद होऊन वादाला तोंड फुटले.विभाग प्रमुखांसमोरच वाद सुरू झाल्याने दोघांना बाहेर जाण्यास सांगितले.मात्र, हा वाद सुरूच राहीला.त्या वेळात संबधीत महिलेने तालुक्यावरून आलेल्या अभियंत्याला चांगलेच झोडपले.प्रकरण वाढल्याचे पाहून विभाग प्रमुखांनी थेट पोलिसांना फोन केल्यानंतर जिल्हा परिषदेतून हे वादादीत प्रकरण पोलिसांत पोहले.


जि.प.च्या सर्वच विभाग प्रमुखांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत,त्यामुळे दालनात झालेल्या ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.अभियंत्याच्या पत्नी समोरच महिलेने मारहाण केल्यानंतर काही आक्षेपार्ह फोटो देखील महिलेने दाखवल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.प्राप्त माहीतीनुसार संबधीत तालुक्याचा अभियंता व महिलेचे यापुर्वीच सोबत तालुक्यावर असतांना सुत जुळले असल्याचे देखील समजते. दरम्यान, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!