भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावप्रशासन

जि. प. सीईओंच्या अचानक भेटी, विना परवानगी गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे निर्देश

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोमवार दि.६ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी अचानक भेटी देऊन आढावा घेतला. या अचानक दिलेल्या भेटी वेळी विना परवानगी गैरहजर आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि. ६ जानेवारी रोजी अत्यंत गोपनीय पद्धतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पारोळा तालुक्यातील शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्र, अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पातोंडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना व पातोंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भेट देऊन आढावा घेतला होता


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या अचानक भेटी दरम्यान काही कर्मचारी व अधिकारी विना परवानगी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते. त्या सोबतच काही ठिकाणी कार्यालयीन दप्तर अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आल्याने सबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!