अंधश्रध्येतुन स्वतःच्या मुलीला अपशकुनी समजून,उपाशी ठेऊन घेतला जीव..!
Monday To Monday News Network।
जळगाव (प्रतिनिधी):-स्वतःच्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला,अंधश्रधेतून अपशकुनी असल्याच्या भावनेतून तिला उपाशी ठेऊन मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच उघडकीला आली होती. या प्रकरणी मुलीच्या आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात पिंप्राळा हुडको परिसरातील जावेद शेख यांना अकरा वर्षांची कनीज नावाची मुलगी होती. या मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईला मुलीचं जन्माला आल्या होत्या. या शिवाय काही अशुभ घटना त्यांच्या परिवारात पूर्वी घडल्या होत्या. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तिचे वडील जावीद शेख हे तिला अपशकुनी समजून नेहमीच तिचा द्वेष करत मारहाण करत असत गेल्या तेवीस तारखेला तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी कोणालाही न सांगता तिचा दफन विधी केला. या घटनेनंतर कणीजच्या मामाने शहरातील रामानंद नगर पोलिसात तक्रार अर्ज देत मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता.
या घटनेच्या पार्शवभूमीवर काल पोलिसांनी कनीजचा गाडलेला मृतदेह बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता. या अहवालनुसार प्राथमिक चौकशीत तिला उपाशी ठेऊन आणि उपचारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अंदाजानुसार तिच्या आई, वडिलांच्या विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.