अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील विटवा येथील शेतकऱ्यांने शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शेतकरी सुभाष विठ्ठल चौधरी (वय ५७) राहणार विटवा यांनी आपल्या शेतात कपाशी व भाजी-पाल्याची लागवड केली होती परंतु, यावर्षी सतत पडणाऱ्या पावसाने या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली, याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.