अरे बापरे…जळगाव जिल्ह्यात आणखी 186 कोरोना बाधित !
जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात 186 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगावात सर्वाधीक बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून जामनेर, रावेर व एरंडोलातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल 186 रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधीक 44 रूग्ण जळगावातील असुन एरंडोल, जामनेर व रावेरात प्रत्येकी 19, तर अमळनेर-17 बोदवड 11, धरणगाव 8, चोपडा 9, पाचोरा 8, मुक्ताईनर, यावल भुसावळ व चाळीसगाव-प्रत्येकी 5 पारोळा 3 जळगाव ग्रामीण 6, भडगाव 3 असे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.
तसेच आज बरे झालेले रुग्ण 74 तर जिल्ह्यात आजवर 1913 रूग्णांनी कोरोनाला मात देत हरविले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 3268 झाली आहे