अविवाहित तरुणाने विषप्राशन करून संपवली जीवनयात्रा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कोरपावली (प्रतिनिधी)। एका अविवाहीत तरुणाने किनगाव येथे विष प्राशन करुन आपली जिवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडली असून तरूणाच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून या बाबत यावल पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
यावल पोलीस सूत्रांकडून मिळाली माहीती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव गावात राहणाऱ्या योगेश सुकलाल धनगर (वय २३ वर्ष, धंदा मजुरी) यांने आज दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६ वाजेच्यापुर्वी किनगाव शिवारातील निवृती सिताराम चौधरी यांच्या शेतात काहीतरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. योगेश हा शेतमजुरी करणारे सुकलाल धनगर यांचा एकुलता एक मुलगा होता. गावातील एका मिनिरल वॉटर पुरवठा करणाऱ्या व्यवसायीकाकडे तो पाणीवाटपाच्या कामास होता. तो शेतीकामे देखील करीत असे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करणाऱ्या या एकुलत्या एक युवकाने आत्महत्या करण्याचा मार्ग का पत्काराला हे मात्र समजु शकले नाही. किनगावचे पोलीस पाटील दिपक भिवसन साळुंके यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशन आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी धंनजय पाचपोळ हे करीत आहे.