भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर भुसावळ मध्ये कारवाई !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी ) शहरात नेब कॉलनी,साई चौकातील एका बंद टपरीच्या आडोशाला सार्वजनिक जागी देशी- विदेशी दारूची अवैधरित्या विक्री सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांना मिळल्यावरून दिनांक १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचून दोन आरोपीना देशी- विदेशी दारू व वाहनासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ शहरात नेब कॉलनी,साई चौकातील एका बंद टपरीच्या आडोशाला सार्वजनिक जागी भुसावळ येथे आरोप प्रकाश मधुकर चौधरी वय ३५ राहणार जामनेर रोड,साईबाबा मंदिर जवळ भुसावळ.दीपक कृष्णा माहलकर वय २९नेब कॉलनी भुसावळ हे दोघे स्वतःच्या फायद्याकरिता बेकायदेशीररित्या देशी- विदेशी दारू अवैधरित्या स्वतःच्या कब्जात बाळगून चोरटी विक्री करतांना मिळून आले.दोघे आरोपींकडून एकूण ६७,५१८ रुपयांची देशी-विदेशी दारू सह एम.एच.१९ बी.एस.२३७१ इग्नितोर कंपनीची मोटर सायकल,तसेच एम.एच १९ ए.जे.३३५१ टीव्ही एस. कंपनीची स्कुटी असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ मा.सोमनाथ वाघचौरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश गोंटला,पोकॉ ईश्वर भालेराव,सुभाष साबळे,गजानन वाघ, चापोकॉ.दिनेश कापडणे अशांनी मिळून केली.गुन्ह्याचा पुढील तपास पोना दिपक जाधव करीत आहे.

जिल्ह्या दंडाधिकारी जळगांव यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण जळगांव जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग होवू नये म्हणून आदेश भंग केला म्हणून त्यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम १८८ सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई ) प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!