ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही; नातेवाईक करोना रुग्णांना पाहू शकणार

मुंबईत सर्वात मोठ्या प्लाझ्मा सेंटरचं लोकार्पण करण्यात आल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा सेंटर (plasma center) उभारण्यात येणार आहे. तसेच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आता त्यांचे नातेवाईक सीसीटिव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहू शकणार आहेत, आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी ही माहिती दिलीय.

मुंबई:

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांना आता नातेवाईकही पाहू शकणार आहेत. रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे नातेवाईकांना आपल्या रुग्णांना पाहणं शक्य होणार आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच तशी माहिती दिली.

आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच राज्यात कम्युनिटी स्प्रेड नाही. पॉझिटिव्ह रुग्ण घरी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी केंद्र

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!