आदर्श शिक्षक किशोर पाटील याचा मृतदेह आढळल्याने खडबड; घातपाताची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
एरंडोल (प्रतिनिधी)। येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.कुंझरकर हे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घरातून निघाले होते. त्या आधी मंगळवारी सायंकाळी भुसावळ येथे एका कार्यक्रमात गेले होते. एवढेच नव्हे तर, मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
अधिक वृत्त असे की,किशोर पाटील कुंझरकर हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून ते मंगळवारी गालापूर येथील शाळेत गेले होते, त्यानंतर त्यांनी भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. घरी परतल्यानंतर पहाटे कुणालाही न सांगता ते घरातून निघाले.त्या नंतर आज पहाटेच त्यांचा मृतदेह आढळून आला.किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक असून किशोर पाटील हे संघटनेशी निगडीत होते., कुंझरकर यांच्या अंगातील डाव्या बाजूचा बनियानचा भाग फाटलेला आहे. तसेच त्यांच्या डोक्याला मार देखील लागलेला आहे. एवढेच नव्हे तर घटनास्थळी त्यांची मोटारसायकल देखील नाहीय.या मुळे घातपताची शक्यता वर्तविली जात असून कुंझरकर यांच्या मोबाईलचा सीडीआरवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.