आदिवासी क्षेत्रात गंभीर अवस्था; रस्त्या अभावी नयामाळात रुग्णाला औषधोपचारास लाकडी दांडीच्या साहाय्याने १५ किलोमीटर पायपीट !
यावल (सुरेश पाटील)। एक आदिवासी बांधव आजारी पडून प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर औषध उपचार करण्यासाठी 15 किलोमीटर अंतरावर औषध उपचार करण्यासाठी रस्ता नसल्याने 2 आदिवासी बांधवांनी एका लाकडी दांड्याला चादर व गोणत्याची झोळी करून आजारी आदिवासी बांधवास औषध उपचार करण्यासाठी नेत असतानाचे बोलके छायाचित्र मिळाले आहे.
यावरून आदिवासी क्षेत्रात आदिवासी बांधवांना आपल्या जिवनात किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आणि हे बोलके छायाचित्र फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल झाल्याने संपूर्ण आदिवासी बांधवांनी मध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करीत असते. परंतु आजही आदिवासी क्षेत्रात अनेक ठिकाणी वाहतुकी लायक रस्ते नसल्याने आदिवासी महिला पुरुषांना अनेक गंभीर अशा परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
घटना आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नयामाळ या गांवातिल रस्ता नसल्याने आजारी पेशंटला १५ किमी. ईच्छागव्हान पर्यंत लाकडी दांडीला बांधून नेताना नयामाळ या गांवातील आदिवासी ग्रामस्थ. ही परिस्थिती अत्यंत भयावह व दुःखद आहे ह्यात ताबोडतोब रस्ता करण्याची लोक संघर्ष मोर्चा तर्फे संघटनेच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, दिलवर वसावे, देविसींग पाडवी, निशांत मगरे इत्यादी लोक संघर्ष मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.