भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्याराष्ट्रीय

एक टॅबलेट फक्त 39 रुपयात मिळणार; कोरोनाचं औषध झालं स्वस्त !

मुंबई (वृत्तसंस्था): कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उपचारासाठी विविध औषधोपचार वापरले जात आहे. त्यात जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं फेविपिरावीर आहे. हे औषध भारतातही तयार होऊ लागल आहे, भारतातील काही औषध कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने हे औषध तयार केलं आहे आणि भारतीयांसाठी स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिलं आहे. आता हे औषध इतकं स्वस्त झालं की एक टॅबलेट फक्त 39 रुपयात उपलब्ध होणार आहे.

जेनबर्ट फार्मास्युटिकल कंपनीने फेविवेंट या नावाने फेविपिरावीरचं औषध लाँच केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत फक्त 39 रुपये असून एका पाकिटात 10 टॅबलेट असतील, असं कंपनीने सांगितलं आहे. फेविपिरावीर हे जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं अँटिव्हायरल औषध असून इन्फ्लुएंझावरील उपचारासाठी हे औषध वापरलं जातं. भारतात सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिली आहे.

याआधी ब्रिन्टॉन औषध कंपनीने फेविटॉन म्हणून हे औषध लाँच केलं आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये आहे. तर ग्लेनमार्क कंपनीने फॅबिफ्लू म्हणून हे औषध विकत आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 75 रुपये आहे. जेनबर्ट कंपनीचे चेअरमन एमडी आशिष यू भुटा यांनी सांगितलं, “भारतात कोरोनाव्हायरससारख्या गंभीर आजाराचं संकट आणि त्यात उद्भवलेली आर्थिक परिस्थिती पाहता समाजाचा एक भाग म्हणून आम्ही औषध कंपन्यांनीही बदलणं गरजेचं आहे. सामाजिक दृष्टीकोनातून समाजहिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे. फेविवेंटसारखं सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या औषधामुळे भारतीयांना वेळेत आणि आवश्यक असलेले उपचार मिळण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!