एकाच कुटुंबातील 6 व्या सदस्याचा मृत्य..काळीजाचे ठोके चुकवणारी दुर्दैवी घटना..मरण स्वस्त झालंय… महागही झालंय….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा ( विशेष प्रतिनिधी ) । कोरोना विषाणू दिवसेंदिवस वाऱ्यासारखा पसरत असून देशातील परिस्थिती अधिक बिकट होत आहे,अनेकांचे कुटुंब चे कुटुंब उद्धवस्थ होताना दिसत आहेत, गेल्या सव्वा महिन्यात सावदा येथील एकाच कुटुंबातील अवघ्या 6 सदस्याचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तीन कर्ते पुरुष व दोन महिला कोरोना संसर्गाने तर एक वयस्करवृद्ध महिला मानसिक धक्क्याने मृत्यू झाला ह्या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनं शहर सुन्न झाले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,सावदा येथील दै सामाना चे पत्रकार कैलाससिंग गणपतसिंग परदेशी याचे 25 मार्च रोजी कोरोनाने निधन झाले,आणि 27 एप्रिल रोजी त्याच्या पत्नी प्रतिभा कैलाससिंग परदेशी याचे ऑक्सिजन अभावी निधन झाले त्याच्यावर जळगाव येथील सारा मल्टी-स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये गेल्या सव्वा महिन्या पासून उपचार सुरू होते ,उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला,ऑक्सिजन संपल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप जळगाव महापौर व उप महापौर याच्या उपस्थित रुग्णालयातच त्यांच्या मुला मुलींनी व नातेवाईकांनी केला असून सदरघटने बाबत रुग्णालयाला महापौर व उपमहापौर यांनी भेट देऊन सविस्तर महिति घेऊन कारवाईचे आश्वासन दिले, सावदा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक कै. सतिशसिंग परदेशी याचे हे मोठे कुटुंब असून गेल्या दीड महिन्या पूर्वी याच्या कुटुंबातील एकामागुन एक असे सहा ते सात सदस्य कोरोना पॉझीटीव्ह आले यानंतर त्यांना उपचारार्थ जळगाव व मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे वर तेथेच उपचार सुरु होते
मरण स्वस्त तर झालंच आहे ,महागही झालंय.परदेशी परिवारावर दुःखाचा डोंगर
दरम्यानच्या काळात प्रथम या कुटुंबातील किशोरसिंग परदेशी यांच्या पत्नी संगीता किशोरसिंग परदेशी, वय 45 यांची प्रकृती खलावली व त्यांचे 21 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 ला निधन झाले, सुनेच्या निधनाची माहिती समजताच दुःख सहन न झाल्याने त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी दि 22 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता किशोरसिंग परदेशी याच्या आई व संगीताच्या सासू कुवरबाई गणपतसिंग परदेशी ,वय 90 यांचे घरीच वृद्धापकाळाने निधन झाले,दि,24 सोमवार रोजी संध्याकाळी 7 वाजता संगीताचे पती किशोर गणपतसिंग परदेशी,वय 53 यांचे देखील निधन झाले, सकाळी लहान भाऊ किशोर परदेशी यांचे निधनाची बातमी येत नाही तोच मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल असलेले त्यांचे मोठे भाऊ व पत्रकार कैलाससिंग गणपतसिंग परदेशी वय 55 यांचे दी,25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता यांचे देखील निधन झाले, त्यावेळी कैलाससिंग त्याच्या पत्नी प्रतिभा ह्या देखील कोरोना पॉझिटिव्ह म्हणून जळगाव येथे ऊपचारार्थ दाखल होत्या ,लाखो रुपये खर्च करूनही जीव वाचवता आला नाही, ही खूप मोठी खंत आहे,
परिवारावर एकच दुखा:चा डोंगर कोसळला,परदेशी परिवातील 4 जण 4 दिवसाचे आत निधन झाले, या दुःखातून सावरत नाही तोच त्याचेच मोठे बंधू रामसिंग (राजू )गणपतसिंग परदेशी, वय 59 याचे 31 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास निधन झाले ,दि,21 मार्च ते 31 मार्च आशा दहा दिवसांत परदेशी कुटुंबातील चार कोरोनाचे शिकार होऊन तर एक वृद्धापकाळाने, आशा पाच सदस्याचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला त्यात आणखी दुर्दैवी भर म्हणून प्रतिभा कैलाससिंग परदेशी गेल्या दीड महिन्या पासून सारा हस्पिटल मधे उपचार घेत असताना उपचाराला त्याच्या कडून काही दिवसांपासून प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यातच काल दि,27 एप्रिल रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, एकाच कुटुंबातील कर्ते तीन भाऊ,व दोन सूना असे पाच व्यक्ती कोरोनाने व आई वृद्धापकाळाने,अशा सहा व्यक्ती 21 मार्च ते 27 एप्रिल या अवघ्या सव्वा महिन्याच्या कालावधीत मृत्युमुखी पडल्याने या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, कोरोनाच्या महामारी काळात एकाच घरातील 6 सदस्याच्या मृत्यूचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन सर्व नागरिकांनी नियमाचे तंतोतंत पालन करावे, तोंडाला माक्स लावणे,सॅनिटायझर चा वापर करणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,सोशल डिस्टन्स पळणे,लसीकरण करून घेणे,कोरोना संसर्गाची वाढ होणार नाही याची दक्षता घेत कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोर। पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.