ऐनपुर येथील ख़िर्डी रोड वरील गटारिंचा झाला दमकोंडा; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर ता.रावेर (इकबाल पिंजारी): ऐनपुर बस स्टॉप जवळून जवळच असलेल्या पुनर्वसन प्लाटला लागुनच ख़िर्डी रोड वरील गटारिंचा चांगलाच दमकोंडा झालेला तसेच श्वास गुदमरल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे शासन-प्रशासन यांच्याकड़ून स्वच्छता व आरोग्याविषयी गाजावाज़ा व मिरवामीरव केली जात आहे तर दुसरीकडे लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्यासारखा प्रकार या गटारी पाहुन दिसून येतोय हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे परिस्थितिमुळे तेथून ये-जा करत असलेल्या नागरिकांच्या तसेच जवळपास राहत असलेल्या रहिवासांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, आरोग्य हिच् संपत्ति असे म्हटले जाते परंतु प्रशासनाच्या अश्या दुर्लक्षामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे असेच दुर्लक्ष आरोग्य विभाग तसेच प्रशासनाचे होत असेल तर नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल
तसेच नागरिकांना अश्या अस्वच्छ गटारी व अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या डास आणि मच्छरांपासून होणाऱ्या मलेरिया वगैरे रोगांशी सामना करावा लागेल असेच जर चित्र गांवभर असेल व अश्याच प्रकारचे दुर्लक्ष प्रशासन करत असेल तर मा.प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन ही संकल्पना यशस्वी होणार तरी कशी ? तरी या गटारीचा श्वास प्रशासनाकडून मोकळा केला जाईल का? व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवले जाईल काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.