ऐनपूर–निंभोरा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता सा.बां. विभागाला मुहूर्त मिळणार कधी ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (भिमराव कोचुरे): ऐनपूर ते निंभोरा या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून जणू काही खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.वाहन धारकांना खड्डयांमुळे आपला जीव मुठीत घेवून तारेवरची कसरत करत या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
अनेक वेळा या रस्त्यांवर किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात.खड्डेमय झालेला रस्ता अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्डयांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची झालेली अत्यंत बिकट अवस्था नेहमी पहावयास मिळते जैसे थे ची परिस्थिती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचा अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाशी वर्गाच्या व वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच संबंधित अधिकारी वर्गाचे ठेकेदारांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने शासकीय नियमानुसार व इस्टीमेट प्रमाणे कामे होत नसल्याने ठेकेदारांच्या मनमानी प्रमाणे काम होत असतात त्यामुळे थातुर मातुर पद्धतीने केलेली कामे काही दिवसातच आपले अंतरंग दाखवितात नियमाप्रमाने सर्वसवी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची तसदी घेतांना दिसत नाही.
यासर्व गोष्टी चा त्रास मात्र प्रवाश्यांना आणि वाहन चालकांना निमूटपणे सहन करावा लागतो.खड्डे चुकवत असताना अनेक वेळा अपघात घडण्याची शक्यता असते त्या मुळे लोकांचे नाहक बळी जात असून या गंभीर बाबी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून त्वरित खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.