भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी !

रावेर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले तालुक्यात  आढावा घेण्यासाठी आले होते. तालुक्यात संसर्ग वाढत असल्याने हाय-रिक्स कोरोना बाधित पेशंटला ऑक्सिजनची कमतरता भासल्यास जळगाव हलवावे लागते त्यामुळे रावेर ग्रामीण रुग्णालय कोरोना ऑक्सिजन सेंटर करण्यासाठी प्रशासनातर्फे पाहणी करण्यात आली असुन तेथील सुद्याची ओपीडी दुसरीकडे हलवण्याचा विचार चालु आहे. त्यासाठी आज प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे,मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी रावेर शहरातील बसस्थानका समोरील बंद असलेल्या नगर परिषदेच्या जुन्या रुग्णालयाची पाहणी केली. 

तालुक्यातील हाय-रिक्स कोरोना पेशंटला तेथेच एड्मिट करून तेथेच त्यांना सुविधा उपलब्ध करण्याच्या विचार प्रशासनाकडून सुरू आहे त्यासाठी प्रांताधिकारी यांनी सरपंच संघटनेची बैठक घेऊन तालुक्यातील दात्यांनी स्वयंस्फुर्तिने शासनाला मदत करण्याचे अवाहन केले.
लोकवर्गणी रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची पाईपलाइनच्या माध्यमातून सुमारे ६० पलंगावर व्हेंटीलेटर लावण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!