भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

कच्चा माल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून पाच लाखांना गंडा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी) :- कापूरवडीचा कच्चा माल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर व मेलवरून वेळोवेळी संपर्क करून 5 लाख 15 हजार 745 रुपये बँकेच्या खात्यात भरण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेची सायबर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की कृष्णम् रघुनाथ लोहे (वय 21, रा. रोहिणीनगर, पेठ रोड, पंचवटी) यांना कापूरवडीचा व्यवसाय असलेल्या 08045804569, 6379786739 व 6384145050 या क्रमांकाच्या मोबाईलधारकाने कापूरवडीचा कच्चा माल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून लोहे यांना gpindustries1980@gmail.com या मेलवरून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 916379786739 यावर, तसेच एन. प्रभाकरन यांचा मोबाईल क्रमांक 8045804569 या क्रमांकावर वेळोवेळी संपर्क करून त्यांना 5 लाख 15 हजार 45 रुपये आंध्र बँकेच्या खात्यावर भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!