करंजी येथे ग्रामसेविका व सरपंचाने १४ वित्त आयोगाचा निधी लाटल्याचा आरोप
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : बोदवड तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत सरपंच जानकीराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंबोरे यांनी संगनमताने 14 वित्त आयोगाच्या निधी परस्पर ठेकेदाराच्या नावे काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती बोदवड यांच्याकडे लेखी निवेदनव्दारे केली आहे.
कंरजी पाचदेवडी येथे 14 वित्त आयोगातून रस्ते कॉकेटिकरण करण्यासाठी ठराव मंजूर होता त्या कामाबाबत कामे व्हावी यासाठी संबधित ठेकेदाराने गावात रेती सिंमेट इत्यादी रस्त्यासाठी लागणारे साहित्य टाकले पंरतु कामे नकरताच ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने ठेकेदाराच्या नावावर पूर्ण रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अशी स्व:ता हा कबूली ग्राम सेविका शिल्पा अंबोरे यांनी दिली आहे ग्रामसेविका शिल्पा अंबोरे यांच्या कडे गोळेगाव कंरजी असे गावे आहेत तसेच गोळेगाव येथे अंबोरे यांना चार वर्ष तरी कामाचा कार्यकाळ झाला असावा त्यामुळे गोळेगाव येथील प्रस्तावित राजकीय मंडळींशी चांगलेच साटेलोटे आहेत त्याच हेतूने कंरजी येथिल झालेल्या प्रकरणात कंरजी येथील सरपंच व ग्रामसेविका यांनी हे काम न करताच एका ठेकेदाराच्या नावावर टाळण्याचा साहस केल्याने कंरजी गावातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे या घोटाळ्या प्रक्ररणी ग्रामसेविका व सरपंच याना निलंबित करण्याची मागणी किसान दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विनोद पाडर आणि नागरिकांनी केली आहे.