किनगाव मंडळ अधिकारी व पथकाची गौण खनिज कारवाईत हँटट्रिक.वाळू वाहतूकदारा मंध्ये खडबड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। किनगाव मंडळ अधिकारी सचिन जगताप व त्याचे भागातील तलाठी पी.एल.पाटील,तलाठी विलास नागरे, तलाठी निखील मिसाळ,तलाठी राजू गोरटे,तलाठी टेमरसिंग बारेला, कोतवाल गणेश वराडे,जहांगीर तडवी,विजय साळवे यांनी गौणखनिज कारवाईत सातत्य राखून अवैध गौण खनिज कारवाईत हँटट्रिक पूर्ण केल्याने वाळू वाहतूकदारां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दि.9/04/2021रोजी चुंचाळे गावाजवळअवैध रेती वाहतूक करणारे डंपर क्र.MH-19-CY 7271चे मालक जितेंद्र सुभाष कोळी रा.विदगाव यांचे,दि 22/04/2021रोजी किनगाव गावाजवळ अवैध रेती
मिश्रित खरवा वाहतूक करणारे ट्रक्टर क्र.MH19-AN-3329ट्रक्टर मालक रविंद्र रामकृष्ण पाटील रा. किनगाव यांचे,दि.26/04/2021 रोजी चिंचोली गावाजवळ अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक्टर क्र.MH-19BJ-8353 ट्रक्टर मालक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील रा. पिंपरी ता.चोपडा यांचे असे 3 वाहने पकडून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन यावल येथे जमा केले.अशाप्रकारे बेधडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.