कुसुंबा प्राण घातक हल्या प्रकरणांत ६ आरोपीनां अटक
जळगाव (प्रतिनिधी)। कुसुंबा येथे २ जणांवर एका गटाने गावातील तुळजाई नगरमध्ये देवी दर्शनासाठी आलेले असतांना चॉपरने हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशीं की, संतोष सुभाष कोळी हा तुळजाई नगर येथे देवी दर्शनासाठी २५ ऑक्टोंबर रोजी १० वाजेच्या सुमारास आला होता. यावेळी गुरु उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय २७, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी) याने काहीएक कारण नसताना संतोषच्या छातीवर व डाव्या पायासह कमरेवर दोन वार केले. त्यानंतर पंकज घोडके सोबत मोटरसायकलवरून उपचाराकरिता जळगाव खुर्द येथे खाजगी रुग्णालयात जात असताना कुणाल सुरेश पाटील (वय २९, रा. तुळजाई नगर, कुसुंबा) राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३२,रामेश्वर कॉलनी जळगाव) मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २५, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी), करण सुदर्शन मनोहर (वय २१, रा. सुप्रीम कॉलनी) सागर यशवंत अवतारी उर्फ अवतारे (वय २१, रा. कुसुंबा) या सर्वांनी संतोष व पंकजला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. तसेच दोघांच्या खिशातील पाकीट व मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी भादवि कलम ३२९ ३२६, १४३, १४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना अटक केली आहे.