भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराजकीय

केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना संपविण्याचे मोठे षडयंत्र. जिल्हा परिषद गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे.

यावल (सुरेश पाटील)। केन्द्र शासनाने नुकतेच मंजूर केलेल्या शेती विषयक विधेयकाच्या निषेधार्थ येथील तालुका काँग्रेस व तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने २आक्टो.ते१०आक्टो. दरम्यान रावेर विधानसभा मतदार संघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलन कार्यक्रम आयोजीत केले आहेत.काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा जि.प. काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी बुधवारी येथिल खरेदी विक्री संघाचे सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराची माहिती उघड केली.

केंद्र शासनाने शेती विषयक अधिवेशनात बहुमताच्या आधारावर विधेयक मंजूर केले हे विधेयक शेतकरी, शेतमजुर यांच्या साठी अत्यंत घातक असून केंद्र सरकार शेतक-यांना संपवण्याचे मोठे छडयंत्र करीत असल्याचे सांगितले.तर जिल्हा इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी हे विधेयक शेतकरी आणि सहकार विरोधी असल्याचे सांगून हे बिल मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शेतकरी चळवळ उभारली जात असल्याचे सांगून महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती दिनापासून तर १०आक्टोबर 2020पर्यत तालुक्यातील ग्रामीण भागात व प्रमुख शहरांमध्ये जावून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे केंद्र सरकारने आणलेले विधेयक हे शेतकरी विरोधी कसे आहेत हे शेतकऱ्यांना पटवून देऊन विधेयका विरोधात लाखो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेवून शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मा.राष्ट्रपतीकडे पाठवून विधेयक मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेत प्रास्ताविक यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदिरखान यांनी केले आहे तर आभार पक्षाचे पदाधिकारी अनिल जंजाळे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, गफफारशाह, संदिप सोनवणे, नईम शेख, रहेमान खाटीक, शे.रहेमान, युवा कार्यकर्ते संदीपभैय्या सोनवणे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्स चे पालन करून तसेच मास्क लावून उपस्थीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!