भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

केंद्र सरकार कडुन होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी !

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असेल, छातीत वेदना सुरू झाल्यास किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. होम आयसोलेशनमधील रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्यांपासून पूर्णपणे वेगळं राहावं लागले, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

नवी दिल्लीः

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना करोनाचे माइल्ड, प्रीसिम्टेमेटिक आणि एसिम्टेमेटीक रुग्णांशी संबंधित आहेत. एचआयव्ही आणि कॅन्सरच्या रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये ठेवता येणार नाही. आता त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावा लागले. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षणाच्या सुरुवातीपासून १० दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.

नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य लक्षण आणि लक्षणं दिसून न आलेल्या रुग्ण पण ज्यांना दूसरा कुठलाही आजार नाहीए तेच फक्त होम आयसोलेशनमध्ये उपचार घेऊ शकतात. पण यासाठीही डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल. होम आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर चाचणीची गरज नाही. लक्षणं दिसून येत नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या आहेत.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असेल, छातीत वेदना सुरू झाल्यास किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. याशिवाय ६० वर्षांवरील रुग्णांवर हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागणार आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसासंबंधी रुग्णांवर हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागतील. होम आयसोलेशनमधील रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्यांपासून पूर्णपणे वेगळं राहावं लागले, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. ज्या राज्यांनी होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी या मार्गदर्शक सूचना लागू असतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!