भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यप्रशासनयावल

कोरोना संकटकाळात प्रशासना तर्फे उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल यावल तहसीलदार जितेन्द्र कूवर यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान !

यावल (सुरेश पाटील)। कोरोनाच्या महामारीत महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन नागरी सेवा करताना उत्कृष्ट आणि कर्तव्यदक्षतेने कामगीरी करत जनतेच्या मनात शासनाच्या कार्याबद्दल विस्वास निर्माण करण्यात प्रभावीपणे तसेच पारदर्शीपणे कामगिरी केल्याने यावल येथील तहसीलदार जितेन्द्र कूवर यांचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या वतीने कौतुक करून सन्मानपत्र करण्यात आला.

कोरोना महामारीच्या संकटात संपुर्ण जिल्ह्यात महसुल प्रशासनाच्या योजना प्रभावी पणे अमलात आणून जनहितासाठी विविध उपाय-योजना केल्या बद्दल तसेच कोरोना विषाणुसंसर्गास आटोक्यात आणण्याकरीता महत्वाची सक्रीय भूमिका बजावणाऱ्या जिल्हाभरातील अधिका-यांचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या वतीने प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात यावलचे तहसीलदार जितेन्द्र कूवर यांचा देखील समावेश असून त्यांचा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली आहे.तहसीलदार जितेन्द्र कूवर यांनी संचारबंदी काळात तालुक्यातील सुमारे एक लाख ३१ हजार नागरिकांपर्यंत शासनाचे मोफत धान्य वितरण करणे तसेच तालुक्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेत प्रभावी व यशस्वी प्रचार-प्रसार केला,लोकवर्गणीतुन यावल तालुक्यात कोविड सेंटर उभारणी कार्यान्ववित करणे व इतर रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारणी , याशिवाय तालुक्यातील अतिदृर्गम क्षेत्रात वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांना पाडयावर जावुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व जिवनावश्क वस्तुंचे वितरण करणे व कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवुन शासना कडून येणाऱ्या आदेशा तात्काळ अमलबजावणी करून नागरीकांमध्ये शासनाच्या कार्याबद्दल विस्वास निर्माण करण्याचे उत्कृष्ट व उल्लेखनीय असे कार्य यावल तालुक्यात केल्याची दखल स्वता: जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी घेऊन तहसीलदार कूवर यांना प्रशिस्तपत्र देऊन सन्मान केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!