भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्या

कोरोना संदर्भात WHO चे मोठे विधान, कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमी !

नवी दिल्ली: जगातील कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ६३ लाखांहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ५ लाख ६३ हजारांहून अधिक आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोरोना विषाणू संदर्भात मोठे विधान केले आहे. नवीन कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयाना यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे.’

रॉयटर्सच्या माहितीनुसार जिनेव्हा येथे झालेल्या एका ऑनलाईन ब्रीफ्रिंग दरम्यान डॉ. माईक रेयान म्हणाले की, ‘सध्या परिस्थितीत कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे वाटत नाही आहे.’ पुढे ते म्हणाले की, ‘कोरोना विषाणूचा झपाट्याने होणार प्रसार रोखून पुन्हा लॉकडाऊनच्या स्थितीत जाण्यापासून रोखता येऊ शकते. पण काही ठिकाणी लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही कारण जंगलात लागलेल्या वणव्यासारखा तिथे कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने वाढत आहे.’

अनेक देशांसह आयलँडने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवले आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ‘इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळत असल्याने संसर्गाचा धोका कायम राहील. तसेच शतकातून एकदा येत असलेल्या या महामारीच्या प्रसाराचा वेग निरंतर वाढत आहे. जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये अद्याप कोरोना नियंत्रित झालेला नाही.’ जागतिक आरोग्य संघटनेने मोठ्या कार्यक्रमांबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, ‘यामुळे कोरोना रुग्णांची प्रकरणे अधिक वेगाने वाढतात.’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

One thought on “कोरोना संदर्भात WHO चे मोठे विधान, कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमी !

Comments are closed.

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!