कोरोना संदर्भातील तक्रार निवारणासाठी जळगावला वॉर रुम स्थापन !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोना बाधित संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे वॉररुम स्थापन करण्यात आली असुन
कोव्हिड-19 संबंधित काही तक्रार किंवा अडचणी असल्यास प्रशासनाकडून दुरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले असुन 2217193 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले गेले आहे.
त्याच सोबत ई पास संबंधित काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 यावर संपर्क न करता 2222750 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. तसेच वॉर रुममध्ये नव्याने दुरध्वनी क्रमांक 2220500 हा वाढविण्यात आल्याने कोव्हिड-19 संबंधित काही तक्रारी/अडचण असल्यास वॉर रुममधील टोल फ्री क्रमांक 1077, 2217193 व 2220500 वर संपर्क साधावा.