भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

कोरोनाचा भूकंप! जळगाव जिल्ह्यात आज नवीन ८७० कोरोना बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ८७० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि रावेर तालुक्यात आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक २२२ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ८६ रूग्ण हे रावेराचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण ७४, पारोळा ३७, जामनेर ३७, पाचोरा १४, भुसावळ १०, अमळनेर ४४, चोपडा ८४, भडगाव ४०, धरणगाव ७१, यावल २५, एरंडोल ५३, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ३, बोदवड ५, अन्य जिल्हा ० असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा २१०९७ इतका झालेला आहे. यातील १४५४३ रूग्ण बरे झाले आहेत. आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ७१३ इतकी  तर उपचार घेत असलेले ५८४१ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!