भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्यारावेरसामाजिक

खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश सावदा रेल्वे स्टेशन येथे खतांचा रॅक थांब्याकरीता रेल्वे प्रशासनाची परवानगी !

सावदा(प्रतिनिधी)। रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यातील कृषिकेंद्र मालक व खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांची 11 जुलै रोजी भेट घेतली होती, या पाच तालुक्यांना खते घेताना जळगाववरून वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्च लागत होता व खते उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात खते उपलब्ध होत नव्हती.

या सदस्यांनी मागणी केली होती, सावदा रेल्वे स्थानक येथे जर खतांचे रॅक खाली करण्यासाठी थांबा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ व खर्चाची बचत होईल. यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी 11 जुलै रोजी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्याशी पत्रव्यवहार करून सावदा येथे खतांच्या रॅक साठी थांबा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

या पाठपुराव्याला यश मिळून लवकरच सावदा रेल्वे स्थानक येथे खतांचे रॅक खाली करण्यासाठी थांबा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. या संदर्भात आज खासदार रक्षाताई खडसे यांनी सावदा रेल्वे स्थानक येथे पाहणी केली व त्याच ठिकाणी कृषिकेंद्र चालक व व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांना यावेळीच रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीचे पत्र सुद्धा खासदार रक्षाताई खडसे यांनी दिले. यावेळी उपस्थित माजी जि. प.सभापती हर्षल पाटील, मुक्ताईनगर भाजपा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, भाजपा ता.चिटणीस जितेंद्र चौधरी, सावदा उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, संचालक कृ.उ.बा.स. पंकज येवले, रावेर तालुका ऍग्री डीलर अध्यक्ष सुनिल कोंडे,बोदवड येथील खंडेलवाल, महेंद्र ट्रेडर्सचे संचालक महेंद्र चौधरी, साईनाथ ऍग्रो चे संचालक सचिन पाटील, तांदलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी प्रेमानंद महाजन व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!