भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी परिसरात अवैध सट्टा धंद्याला सुगीचे दिवस ” मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर ” पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष….

खिर्डी ता.रावेर(विशेष प्रतिनिधी): लॉकडाऊन असो वा कुठलीही, काहीही परिस्थिती असो, महागाई असो की सस्ताई , अथवा हिवाळा,पावसाळा किंवा उन्हाळा ,कोणताही ऋतु असो, सट्ट्याचा धंदा मात्र अबाधित पणे सुरू असतो, या धंद्याने खिर्डी परिसरात जोर धरला असून या कडे स्थानिक पोलिसां कडून जाणून बुजून ‘अर्थपूर्ण ‘ दुर्लक्ष्य केले जात तर नाही ना..! असा प्रश्न चर्चिला जात आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की,खिर्डी परिसर हा नेहमी वर्दळीचा भाग असून खिर्डी बु;व खु ; अशी दोन गावे मिळून मोठा एरिया गणला जातो तसेच खिर्डी बुद्रुक व खुर्द ला लागून अनेक खेडे लागू असल्याने या ठिकाणी जवळच्या खेड्या पाड्यातून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग कामा निमीत्त येजा करत असून हे या भागाचे सट्ट्याचे प्रमुख केंद्र आहे व्यावसायिकाने ह्या भागाचा विचार करूनच आपले बस्तान बसविले आहे या साठी २०-२५ पंटर नेमलेले असून दररोज या गाव परिसरात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याने या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे.

आकड्यांचा भाव १रु. ला ८०रु, प्रमाणे हा कल्याण वरळी चा खेळ सुरू असून सट्टा खेळणाऱ्या मध्ये श्रीमंतां पासून तर सामान्य व गोरगरीब मजूर वर्ग सर्वच लोक विना मेहनतीने श्रीमंत होण्याच्या नादात हव्यासापोटी ५ रु, पासून ते १०००रु, पर्यंत पैसे लावतात परंतु त्यांच्या पदरी नेहमी निराशाच येत असते.यात सट्टा घेणारा व्यवसायिकच मोठा होत असतो ही सत्य परिस्थिती आहे. या मुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागले आहे. व काही उध्वस्त झाले आहेत. ६ ते ७ महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने केलेली थातुर मातुर कारवाई ,हा एक देखावा केला गेला होता ” मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर” अशी परिस्थिती असून सर्व काही आलवेल दिसत आहे. पोलिसां कडून याचे कडे जाणून बुजून तर दुर्लक्ष केले जात नाही ना …..अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात खिर्डी परिसरात जोरात सुरू असल्याने या भागात सुरू असलेला सट्टा व्यवसाय हद्दपार होईल का…?असा प्रश्न निर्माण झालेलाआहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!