खिर्डी बुद्रुक येथे कोरोनाचा शिरकाव;एका महिलेसह एक पुरुष पॉझिटिव्ह !
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील दि.९ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढल्याने गावात एकच खळबळ उडाली.महत्वाचे म्हणजे खिर्डी गाव बरेच दिवसापासून कोरोना मुक्त होते मात्र खिर्डीला ही कोरोनाचे ग्रहण लागले असुन.यात खिर्डी बुद्रुक येथील आंबेडकर नगर येथील एक ४८ वर्षीय पुरुष तर बेघरवस्ती परिसरातील एक ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून कोरोना बाधित महिला ही खिर्डी बुद्रुक येथील रहिवासी असून ती गेल्या तेरा दिवसापासून यावल तालुक्यातील अंजाळे येथे अंतयात्रे साठी गेली असता त्या ठिकाणी त्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिच्या संपर्कातील खबरदारी म्हणून एकूण पाच जणांना तर बाधित पुरुष याच्या संपर्कातील चार संशयित जणांना कोविड सेंटर ला कॉरंटाईन करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी रावेर तालुका वैधकीय अधिकारी शिवराय पाटील,निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ चंदन पाटील ,तलाठी एफ एस खान,खिर्डी बुद्रुक ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन,खिर्डी येथील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,खिर्डी येथील लोकनियुक्त सरपंच किरण कोळी(गफूर कोळी),घनश्याम पाटील,माजी पोलीस पाटील अरुण पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ऍड चांद्रजित पाटील,ग्राम पंचायत सदस्य गंभीर पाटील,योगेश जाधव,पंकज राणे,किरण नेमाडे,महेंद्र कोचुरे,डिगंबर कोळी,श्रीराम सोनवणे,आदी सह आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.सदरहून दोन पैकी एक कंटेंटमेंट झोन घोषीत करण्यात आले असून संबंधित परिसर आरोग्य विभाग तसेच ग्राम पंचायत प्रशासनाकडून सील करण्यात आले असून खिर्डी बुद्रुक व खिर्डी खुर्द येथे पाच दिवसाचे जनता कर्फ्यु लावण्यात आले आहे.