खिर्डी बुद्रुक येथे पुन्हा २ जण तर विवरा खुर्द येथे १ कोरोना बाधित.
विवरे, ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील काल रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये खिर्डी बुद्रुक येथील २ व विवरे खुर्द मधील १ रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे
खिर्डी बु. येथील बस स्थानक परिसरातील श्रीकृष्ण मंदिर परिसरातील १ रुग्ण वय ४२ व गांधी चौक मधील एक ५४ वर्षीय रुग्ण आढल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या रहिवासी असलेला परिसर सील करण्यात आला आहे. खिर्डी बुद्रुक गावात एकूण रुग्ण संख्या बारा वर पोहचली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 4 व्यक्तींचे तपासणी साठी स्लॅब पाठवन्यात आले आहे. तर विवरा खुर्द गावातही एक ७२ वर्षीय वृद्ध पुरुष बाधित आढळून आला आहे, बाधित रुग्ण उतखेडा रोड ,महादेव मंदिर परिसरात रहिवासी असून गावात बाधित आढळून आल्याने परिसराची चिंता वाढली आहे.
खिर्डी बु. येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ७ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. ग्राम प्रशासन कडून नागरिकांना घराबाहेर महत्वाच्या कामाशिवाय जाऊ नका .घाबरु नका काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा वारंवार सुचना देण्यात येत आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.