भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी येथे महावितरण चा भोंगळ व गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात….

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी):- खिर्डी खु येथील नविन गावठाण परिसरात बलवाडी रस्त्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर ला जोडलेल्या ४४०व्होल्टेज च्या केबल वायरला मारलेला जॉइंट कित्येक दिवसांपासून धोकादायक पध्दतीने उघडा आहे.त्यावर कोणत्याही प्रकारचे आच्छादन नसल्याने जनावरांना,लहान मुलांना शॉक लागण्याचा धोका संभवतो या बाबत वारंवार वायरमन ला सांगून सुध्दा काही एक फरक पडत नाही कोणी मरेल तेव्हा बघू काय होईल ते असे उर्मट भाषेतील उत्तर नागरिकांना नेहमी एकावयास मिळतात.तसेच विजेच्या तारांजवळ बहुतांश ठिकाणी मोठी मोठी वृक्ष असल्याने या वृक्षांच्या फांद्यांमुळे फॉल्ट होऊन ठिणग्या पडत असतात.एखाद्या वेळेस काही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण,?असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे.

विजेचा खेळ खंडोबा,उघड्या कनेक्शन बॉक्स,भरमसाठ वीज बिले,लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा,वाकलेले विजेचे खांब,अश्या प्रकारे महावितरण च्या भोंगळ व गलथान कारभाराची प्रचिती ग्राहकांना कुठे ना कुठे समोर येते.तसेच बलवाडी रोडच्या बाजूला असलेल्या शेतात 11kv हाई टेन्शन विजवाहिनी चे खांब कित्येक दिवसापासून पावसामुळे वाकलेले असून त्यांची पाहणी करण्यास एकही कर्मचारी किंवा अधिकारी फिरकुन सुध्दा पाहत नाहीत.खांब उभे करते वेळी पाच फूट खोल गड्डा न खोदता तीन ते साडेतीन फुटापर्यंत गड्डा खोदून त्या ठिकाणी सिमेंट व गिटटी न वापरता मातीने खांब जाम करण्यात आले.अत्यंत कमकुवत काम केलेले असून वादळ वारा आणि पावसाने खांब वाकले तर काही जमीनदोस्त झाले आहे. शेतशिवारात अनेक ठिकाणी वीज तारांना जमिनीवरून हाताचा स्पर्श होईल अश्या पध्दतीने वीज तारा लोंबकळत आहे.तसेच अनवधानाने शेतमजुराचा वीज तारांना स्पर्श झाल्यास जबर शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.या बाबत शेतकऱ्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांकडे वाकलेले खांब सरळ उभे करून ताण काढावा अशी विनंती करून सुध्दा त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे.एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी व कर्मचारी पळापळ करतील का? असा गहन प्रश्न नागरिकांना पडला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी सांगून टाळाटाळ केली जात आहे.दुरुस्ती होत नाही.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात केवळ ठाण मांडून बसण्यापेक्षा आपल्या कार्यक्षेत्रातील दुरवस्थेची व गलथान कारभाराची तसेच वाकलेले खांब, लोंबकळत असलेल्या वीज तारा यांची पाहणी करून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबतचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावेत अशी मागणी शेतकरी तसेच ग्राहक वर्गातून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!