भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी।परिसरात हरभरा पिकावरअळीचा प्रादुर्भाव

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी,ता.रावेर,प्रतिनिधी। अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे.त्यामुळे पिकावर केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी झाला असून शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत , गहू, हरभरा,मका इत्यादी पिकांची शेतात मोठया प्रमाणात लागवड केली. लागवडीनंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली असता
मात्र वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव ,थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशके,किटकनाशक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या हरभरा पिकाला मोठ्या प्रमाणात फुलोरा व घाटे लागले आहेत. मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परिणाम होत नाही. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!