खुशखबर! भारतात १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार कोरोनाची पहिली लस!
मुंबई:
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे, अशी गेल्या काही दिवसांपुर्वी बातमी होती. मात्र ही लस कधी लाँच होणार याची देखील प्रतिक्षा सर्वांनाच होती. अखेर ही प्रतिक्षा संपणार असल्याचे दिसत आहे, कारण १५ ऑगस्ट रोजी ही लस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. ही लस लाँच झाल्यानंतर लगेच या लसीचा वापर कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतात कोरोनावर लस तयार झाली असून ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. तर भारत बायोटेक व आयसीएमआर तर्फे या लसीचे लाँचिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या लसीला मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे. आयसीएमआरने जारी केलेल्या पत्रानुसार ७ जुलैपासून मानवी चाचण्यांसाठी नाव नोंदणीस प्रारंभ होणार आहे. यानंतर, जर सर्व चाचण्या योग्य झाल्या असतील तर १५ ऑगस्टपर्यंत कोवैक्सीन ही लस सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. कोरोना दरम्यान सर्व प्रथम, भारत बायोटेकची ही लस बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने अलीकडेच दावा केला होता की कोव्हॅक्सिनच्या फेज -१ आणि फेज -२ मानवी चाचण्यांनाही डीसीजीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाचणीचे काम सुरू केले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
तसेच भारत बायोटेकला लस बनवण्याचा पूर्वीचा अनुभव आहे. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव असून पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने या लस तयार केल्या असल्याचे सांगितले जात आहे. करोना व्हायरसशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेन पुण्यातील नॅशलन इन्सिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)मध्ये वेगळं केलं गेलंय. यानंतर हा स्ट्रेन भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात आला. भारत बायोटेकने तयार केलेली लस ही करोनावरील देशातील पहिली लस आहे. हैदराबादमधील जिनोम व्हॅलीत अति सुरक्षित लॅबमध्ये बीएसएल-३ (बायोसेफ्टी लेव्हल ३) ही लस बनवण्यात आली आहे.