ग्रामपंचायत उजेडात नागरिक अंधारात…
खिर्डी (प्रतिनिधी)। खिर्डी बुद्रुक येथील वार्ड नंबर ४ मधील मोरेश्वर कॉलनी गणपती मंदिर परिसरात गेली तीन-चार महिन्यापासून गणपती परिसरातील पथ दिवे बंद पडलेली आहे वेळोवेळी ग्रामपंचायत कडे तोंडी तसेच लेखी तक्रार करून ही पथ दिव्यांची व्यवस्था झालेली नाही.व गरज नसेल तेथे पथ दिवे दिवसा सुद्धा चालूच राहतात पण गणपती परिसरात गरज असताना देखील ग्रामपंचायत का लक्ष देत नाही हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. सद्या पावसाळा सुरू असून मोठ्या प्रमाणावर जीवजंतू व विषारी साप हे रस्तावर निघत असून पथ दिवे नसल्याणे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची संभावना आहे. या परिसरात लवकरात लवकर पथ दिव्याची सोय ग्रामपंचायत ने करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.