घरगुती गॅस, इंधन दरवाढी विरोधात यावल राष्ट्रवादीचे आंदोलन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन:
यावल, प्रतिनिधी: गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिंलिंडरसह पेट्रोल-डीझेल व इंजिन आईल मध्ये केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने येथील भुसावळ टी पॉइंट वर. माजी आमदार मनीष जैन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास धरणे आंदोलन करीत चुलीवर स्वयंपाक करून करून निषेध व्यक्त केला.प्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील ,फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , शहराध्यक्ष करीम मन्यार , एम.बी. तडवी, विनोद कोल्हे , युवकचे हितेश गजरे; गीरधर पाटील, विजय पाटील, दिनकर पाटील,ललीत पाटील, वसंत पाटील, अमोल दुसाने,द्वारका पाटील,माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते,दिपक पाटील सहभागी झाले होते.