चिंता कायम; जळगाव जिल्ह्यात आज आणखी २२६ रुग्णांना कोरोनाची बाधा !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २२६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २२६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत, यात सर्वाधीक ९४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण २८ रूग्ण आढळून आले आहेत. म्हणजे जळगाव तालुक्यात तब्बल १२२ रूग्ण आढळले आहेत. याच्या खालोखाल जामनेर २५, चोपडा २४, अमळनेर २१, भुसावळ १०, पाचोरा २, भडगाव ६, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ५, पारोळा ३, चाळीसगाव व बोदवड-प्रत्येकी १ व अन्य जिल्ह्यातील १ अशी कोरोना बाधीतांची संख्या आढळून आली आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६३९३ इतका झालेला आहे. यातील ३८८७ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५४९; कोविड हॉस्पीटलमध्ये-१२७ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये २६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३४३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.