ताज्या बातम्यारावेर

चिंता कायम ; सावद्यात दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा एक पाल येथील रहिवासी !

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी): तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही काल रात्री उशिरा आलेल्या अहवाला मध्ये पुन्हा दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आले आहे. यामध्ये एका ५५ वर्षीय पुरुषांचा व ५३ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश असून यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असुन पुरुष व्यक्ती हा पाल येथील रहिवासी असून त्यांचा स्लॅब सावद्यावरून गेला असल्या कारणाने अहवाल सावदा शहरातील अहवालांमध्ये गणला गेला आहे. त्यामुळे सावदा येथील फक्त एक महिला बाधित असून सदरील महिला ही ओम कॉलनी परिसरातील शासकीय विश्राम गृह समोरील परिसरातील रहिवासी आहे. पुन्हा परिसरातील चिंतेच्या वातावरणात भर पडली असुन सावदा शहरात जनते कडून ३ दिवसांच्या जनता कर्फ्युचे लागू असतांना सुद्धा रुग्ण बाधित आढळल्याने वातावरण चिंतामय झाले आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात असून सदरील वृत्तास स्थानिक नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ५९ झाली असुन त्यात ९ मयत आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!