चिंताजनक; चिनावल कोरोनाच्या विळख्यात पुन्हा 4 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित !
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. आज आलेल्या अहवालात गावातील 4 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एक महिला 47 वर्षीय, एक 27 वर्षीय मुलगा व 4 वर्षीय मुलगा व 52 वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे. आता पुन्हा चार अहवाल बाधित आढळून आल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. सदरील सर्व रुग्ण महादेव वाडा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाइन करण्यात येत असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने गावच्या सरपंच सौ.भावना योगेश बोरोले यांच्या कडून दुजोरा मिळाला असुन योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.
खेड्या-पाड्यातकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता चिनावल येथे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या सदरील बैठकीस प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, चिनावलच्या सरपंच सौ. भावना बोरोले यांच्या सह बाजूच्या 20 गावचे सरपंच व आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्तीत होते
चिनावल गावांतील कोरोना बाधित रुग्ण संख्या 33 असुन त्यात 2 मयत आहेत
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.