चिनावलात जनतेसाठी ३ दिवस जनता कर्फ्युचे आयोजन !
चिनावल, ता.रावेर (प्रतिनिधी): गावात काही दिवसांपासून कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी ग्रामपंचाय , आरोग्य व पोलीस प्रशासन कडून मोठे प्रयत्न केले गेले. सद्यस्थितीत गावात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र कोरोनावर चिनावल येथे पूर्ण नियंत्रण आणणे साठी येथल्या १४ ते १६ ह्या दिवसांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे.
कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु हा पर्याय अवलंबून या काळात फक्त दवाखाने , मेडिकल व दुधडेअरी च सुरू राहतील कोणीही आपले दुकाने व आस्थापने उघडू नये तसेच नागरिकांनी ही या तिन दिवसांत घराच्या बाहेर पडू नये सूचने चे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणेत येईल असे आवाहन ग्रामपंचायत चिनावल तर्फे करण्यात आले आहे.
लोकनियुक्त सरपंच सौ भावना योगेश बोरोले, उपसरपंच परेश महाजन, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले, चिनावल प्रा.आ.केद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ .विजया झोपे, आरोग्य सेवक डॉ ठाकूर यांनी जनता कर्फ्यु पाळून गावांतून कोरोना हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे.