जळगांव जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ५७१ तर रिकव्हरी रेट ९६.५६ टक्के
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या ५७१ पर्यत खाली आली आहे. आज (दि.८ नोव्हेंबर) ६८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५१ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज १८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात आज रोजी एकूण 571 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 190 इतकी आहे यातील 26 रुग्ण आयसीयुमध्ये असून 94 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर 381 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1272 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर 2.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 हजार 550 (18.21 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या 198 अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात 369 व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर 107 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
आज सायंकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यातून ३९ रूग्ण आढळून आले आहे. तर ५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच जिल्ह्यातील दहा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे.
आजची आकडेवारी
अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यात आज एक रूग्ण आढळले नाहीत. तर जळगाव शहर-११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१९, चोपडा-२, यावल-१, चाळीसगाव-५ रूग्ण असे एकुण जिल्ह्यात आज ३९ रूग्ण आढळून आले आहे.