भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

जळगाव च्या तरुणाचा यावल तालुक्यात खून

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर, जळगाव) या १८ वर्षीय तरुणाचा यावल तालुक्यात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना २ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली.

इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवल्याच्या वादातून, यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर, जळगाव) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तुषार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तुषारच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.

तुषार चंद्रकांत तायडे हा परिवारासह समता नगर येथे राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे काही लोकांशी वाद झाले होते. असी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली. दरम्यान तुषार हा मंगळवारी यावल तालुक्यातील वड्डी परसाडे या गावात आजीचे निधन झाले होते. या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो जळगाव परत येण्यासाठी निघाला तेव्हा त्याला काही तरुणांनी तुषार तायडेला घेरले. जुन्या वादातून त्याला बेदम मारहाण केली. सदर ही घटना संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान होती.

यावल शहर जवळील पाटजवळ तुषार तायडे जखमी अवस्थेत पडलेला दिसला. तेथून त्याला नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यात त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला होता. तुषारने त्याच्या वडिलांना फोन करून काही तरुण त्याला मारहाण करीत असल्याबाबत सांगितले होते. यावल रुग्णालयात मुलाला जखमी अवस्थेत पाहून त्यांनी एकच आक्रोश केला.

प्रथमोपचार करून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना काही वेळातच तुषारचा मृत्यू झाला. प्रसंगी रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर जळगावच्या रुग्णालयात देखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.दरम्यान तरुणाला मारहाण करणारे संशयित आरोपी मारहाण केल्यानंतर पसार झाले. त्यांचेविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!